विकासकामे करताना भेदभाव करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:56+5:302021-09-22T04:24:56+5:30

टाकळीभान येथील टेलटँक (गोविंदसागर) जलाशयाचे जलपूजन तसेच इतर विकासकामांचे लोकार्पण रविवारी (दि. १९) आमदार कानडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ...

Does not discriminate in development work | विकासकामे करताना भेदभाव करत नाही

विकासकामे करताना भेदभाव करत नाही

टाकळीभान येथील टेलटँक (गोविंदसागर) जलाशयाचे जलपूजन तसेच इतर विकासकामांचे लोकार्पण रविवारी (दि. १९) आमदार कानडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक होते. यावेळी शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, अशोक कानडे, पंचायत समिती सदस्या वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, उपसरपंच कान्हा खंडागळे, भारत भवार, ॲड. सर्जेराव कापसे, अनिल चितळे उपस्थित होते.

कानडे म्हणाले, तालुक्यातील ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असल्या किंवा नसल्या तरीही मी विकासकामे करतो. मी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय इतर कुणीही लाटू नये. श्रीरामपूर तालुका हा शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यात शेती पाण्याचे सुयोग्य नियोजन आपण केले आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणे रिकामे असतानाही टाकळीभान टेलटँक भरण्यासाठी प्रयत्न केला. विजेबाबत शेतकरी व ग्रामस्थांची अडचण ओळखून अनेक ठिकाणी सबस्टेशन मंजूर केले. टाकळीभान-बेलपिंपळगाव रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून, त्याही रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. नेवासा फाटा ते बाभळेश्वर या मार्गासाठी १३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, पुढील महिन्यात या कामास सुरुवात होणार आहे. याप्रसंगी जलजीवन मिशन अंतर्गत वाढीव जलवाहिनीसाठी १ कोटीचा निधी मिळावा, पाणीपुरवठा योजनेसाठी २४ तास वीज पुरवठा उप्लब्ध व्हावा, टेलटँकमध्ये पाणी येण्यासाठी असणाऱ्या पाटाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, टाकळीभान कमान ते महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे दुहेरीकरण करण्यात यावे व इंदिरानगर येथे मागासवर्गीय कुटुंबांना उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी १०० चे रोहित्र मिळावे अशा मागण्या उपसरपंच खंडागळे यांनी केल्या.

पंचायत समिती सदस्या डाॅ. वंदना मुरकुटे यांनी त्यांच्या मंजूर निधीतून टाकळीभानकरिता पिण्याच्या पाण्याची टाकी देण्याचे जाहीर केले. यावेळी आ. कानडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महादेव मंदिर पूल, रोहित्र व व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेब बनकर, प्रा. विजय बोर्डे, विलास दाभाडे, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे, संविधान ग्रुपचे सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत भवार यांनी केले. आभार राजेंद्र कोकणे यांनी मानले.

Web Title: Does not discriminate in development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.