काळकूप येथे जनसेवा ग्रामविकासचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:54+5:302021-01-24T04:09:54+5:30
भाळवणी : पारनेर तालुक्यातील काळकूप येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार नीलेश लंके प्रणित जनसेवा ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ९ जागा ...
भाळवणी : पारनेर तालुक्यातील काळकूप येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार नीलेश लंके प्रणित जनसेवा ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकल्या असून, विरोधी परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा पराभव झाला. येथील युवा कार्यकर्ते भागाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ९ जागांवर विरोधी माजी सरपंच वसंतराव सालके यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव केला. विजयी उमेदवार असे : राजेंद्र गुलाब कदम, संदीप पोपट कदम, कमल सुनील अडसूळ, किरण अंबादास अडसूळ, ताराबाई दिनकर कदम, रंजना भाऊसाहेब खरमाळे, संगीता विजय शिंदे, महेंद्र राधुजी सालके, किसन रेवजी शिंदे हे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते सुंदरदास कदम, गुलाब माधव कदम, पाराजी शिंदे, रंगनाथ खरमाळे, मच्छींद्र खरमाळे, पांडुरंग कदम (मेजर), आर. डी. अडसूळ, भाऊसाहेब अडसूळ, जगन्नाथ सालके, भानुदास कदम, बाळासाहेब कदम, बाबासाहेब अडसूळ आदींसह तरुणांनी मोठे परिश्रम घेतले.
फोटो : २३ काळकूप
काळकूप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व ग्रामस्थ.