मक्तापूर ग्रामपंचायतीवर सहकार ग्रामविकासचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:45+5:302021-01-22T04:19:45+5:30
नेवासा : तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या नेतृत्वात व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या ...
नेवासा : तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या नेतृत्वात व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार ग्रामविकास पॅनलने जनसेवा ग्रामविकास पॅनलचा पराभव करत वर्चस्व मिळविले.
सहकार ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ५ व अपक्ष १ अशा सहा जागा मिळविल्या. विरोधी गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी सहकार ग्रामविकास पॅनलचे प्रमुख रावसाहेब कांगुणे यांनी विजयाचे सर्व श्रेय मतदारांना दिले. यापुढील काळात ग्रामपंचायतीत मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वात निधी आणून विकासकामे करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी सहकार विकास पॅनलचे निवडून आलेले गोरक्षनाथ बर्डे, अमृता गोरे, सुशीला लहारे, अपक्ष भरत काळे, राहुल साळवे, अलका साळवे व विरोधी गटाचे अजय कोळेकर, राजश्री कोळेकर, उषाताई कराडे यांचाही सन्मान करण्यात आला.
फोटो : २१ मक्तापूर
मक्तापूर ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवारांचा पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.