पारस उद्योग समूहातर्फे अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:32+5:302021-01-22T04:19:32+5:30
अहमदनगर : अयोध्येमध्ये साकारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्माणासाठी अहमदनगरमधील उद्योजक व पारस उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक पेमराज माणकचंदजी बोथरा ...
अहमदनगर : अयोध्येमध्ये साकारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्माणासाठी अहमदनगरमधील उद्योजक व पारस उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक पेमराज माणकचंदजी बोथरा यांच्याकडून अकरा लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य किशोरजी व्यास उर्फ गोविंदगिरी महाराज यांच्याकडे त्यांनी सुपुर्द केला.
या छोटेखानी कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोथरा म्हणाले, अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर हे करोडो भारतीयांचे स्वप्न आहे. ते साकारण्यात पारसनेही छोटासा वाटा उचलला ही पारस उद्योग समूह व बोथरा परिवारासाठी अभिमानाची व भाग्याची गोष्ट आहे.
गोविंदगिरीजी महाराज म्हणाले, अयोध्येतील उभारण्यात येणारे राम मंदिर हे एक हजार वर्षांपेक्षाही अधिक काळ मजबूत राहील, असा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर निर्मितीत प्रत्येक भाविकाला आपले योगदान देता यावे, यासाठी निधी समर्पण अभियान सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक धर्मप्रेमी समाजबांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. बोथरा परिवारही अतिशय धार्मिक व श्रध्दा बाळगणारा आहे. अहमदनगरमधूनही या धार्मिक कार्यास मोठा हातभार लागेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. (वा. प्र.)
---
फोटो- २१ बोथरा फोटो
पारस उद्योग समूहाचे पारस बोथरा यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांचा धनादेश गोविंदगिरी महाराज यांच्याकडे सुपुर्द केला.