डोंगरगण, मांजरसुंबा, गुंडेगावला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:12+5:302021-05-09T04:21:12+5:30

केडगाव : नगर शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १२ हजारांच्या घरात गेली ...

Dongargan, Manjarsumba, Gundegaon to Corona | डोंगरगण, मांजरसुंबा, गुंडेगावला कोरोनाचा विळखा

डोंगरगण, मांजरसुंबा, गुंडेगावला कोरोनाचा विळखा

केडगाव : नगर शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १२ हजारांच्या घरात गेली असून, कोरोनाने आतापर्यंत तालुक्यातील २५४ जणांचा बळी घेतला आहे. तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा, गुंडेगाव, बहिरवाडी या राज्यस्तरीय बक्षिसे मिळविणाऱ्या गावांतही कोरोनाचा कहर सुरू आहे.

तालुक्यातील १०६ गावांतील १ लाख ३९ हजार ९४४ लोकसंख्येपैकी आतापर्यंत ११ हजार ५७३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ९ हजार ७१२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, तालुक्यातील २५४ जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या तालुक्यात १ हजार ६०७ सक्रिय रुग्ण असून, यातील १९४ रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्कार मिळालेल्या बहिरवाडी गावात ४६ रुग्ण आढळले आहेत. सध्या ९ रुग्ण सक्रिय असून, एका जणाचा बळी गेला आहे. आदर्शगाव डोंगर गणामध्येही आतापर्यंत १०० रुग्ण आढळले आहेत. सध्या ३६ सक्रिय रुग्ण असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आदर्शगाव मांजरसुंबातही १२ रुग्ण आढळले आहेत. राज्याचा वनग्राम पुरस्कार मिळवणाऱ्या गुंडेगावात आतापर्यंत ५० रुग्ण सापडले आहेत. यात ४ रुग्ण सक्रिय असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी जेऊर केंद्रात सर्वाधिक १ हजार ७५१ रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यूतही जेऊर केंद्र आघाडीवर आहे. या केंद्रांतर्गत गावात ४९ मृत्यू झाले आहेत. सर्वांत कमी रुग्णसंख्या रुईछत्तीशी केंद्रात असून, आतापर्यंत ७९७ रुग्णसंख्या आहे.

---

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रुग्णसंख्या

मेहेकरी- ८७७,

देवगाव- १४४६,

जेऊर- १७५१,

चास-१४८१,

टाकळी काझी- १२६३,

वाळकी- १२३६,

देहेरे- १४४२,

टाकळी खातगाव- १२८०, रुईछत्तीसी- ७९७.

---

सद्य:स्थिती

एकूण रुग्ण- ११,५७३.

मृत्यू- २५४.

बरे झालेले- ९७१२.

सक्रिय रुग्ण- १६०७.

एप्रिल महिन्यातील रुग्ण- ९८२४.

---

हॉटस्पॉट गावे..

बुऱ्हाणनगर- ३४५, नागरदेवळे-६७६,

जेऊर- ५४२, अकोळनेर- ४५२, दरेवाडी- ४०४, वाळकी- २९९, वडगाव गुप्ता -४८२, नवनागापूर- ४१३, निंबळक-३६०,

अरणगाव- २८६.

Web Title: Dongargan, Manjarsumba, Gundegaon to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.