सामाजिक बांधिलकीतून दानशूरांची कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:25+5:302021-05-11T04:21:25+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सुरू असलेल्या पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरास दानशूरांनी सामाजिक बांधिलकी ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सुरू असलेल्या पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरास दानशूरांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे.
पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांनी परिसरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णांना योग्य उपचार झटपट मिळावेत या सामाजिक बांधिलकीतून श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत ५ ० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. सध्या २३ व्यक्ती तेथे उपचार घेत आहेत.
दोन दिवसातून एकदा संतोष जठार व अमोल ठुबे हे संपूर्ण सेंटर औषध फवारणी विनामूल्य करून देतात.
तसेच सेंटरला पुढीलप्रमाणे रोख स्वरूपात मदत आली आहे.
मढेवडगावचे युवा उद्योजक दिनेश गायकवाड दहा हजार रुपये, माजी सरपंच मंगल कौठाळे एक हजार मास्क, नानाभाऊ वाघमारे व प्राथमिक शिक्षक ११ हजार, अमोल गावडे दहा हजार, पोपटराव सातव, येवतीचे सरपंच भीमराज दिवटे, अभिजित दिघे प्रत्येकी ५ हजार, डॉ. नानाभाऊ करंजुले, अक्षय साबळे प्रत्येकी तीन हजार, महादेव शिर्के, प्रदीप आढाव, महादेव आढाव, अरुण आढाव प्रत्येकी २ हजार १०० रुपये, बाळासाहेब नावकर व प्रशांत बनकर यांनी बीपी व शुगर मशीन अशी मदत दिली आहे.
रुग्णांचे दररोजचे जेवण तयार करण्याचे काम आप्पासाहेब गुंजाळ करत आहेत.
कोविड सेंटरची अहोरात्र सर्व व्यवस्था पाहण्याचे काम प्रतीक वाघमारे, सुरज मुळे, अजित वाघमारे, सचिन माने, किशोर गायकवाड, बाळासाहेब कौठाळे, सुयोग गायकवाड, प्रमोद उबाळे, प्रतीक वेताळ, इक्बाल शेख व इतर तरुण करत आहेत.