घाबरू नका, लहान मुलांच्या योग्यवेळी तपासण्या करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:09+5:302021-04-06T04:19:09+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, दुसऱ्या लाटेत लहान मुल आणि ...
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, दुसऱ्या लाटेत लहान मुल आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. गृह विलगीकरणामुळे घरातील व्यक्तींकडून लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण मोठे आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाची नगर जिल्ह्यात सुरुवात झाली. सुरुवातीच्या लाटेत लहान मुले व किशोरवयीन मुलांमध्ये संक्रमणाचे प्रमाण अत्यंत कमी होते. मृत्यूदरही कमी होता. परंतु, दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने रुग्णांची संख्या वाढली. रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने व ५ ते ८ वीच्या शाळा मध्यंतरी सुरू होत्या. या काळात १० ते २० वयोगटातील मुला-मुलींमध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, जुलाब, यासारखी लक्षणे आढळून आली. ० ते १० वयोगटातील मुलांमध्ये अशी लक्षणे आढळण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, १० ते २० वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक मुलांमध्ये सारखी लक्षणे नाहीत. वेगवेगळी लक्षणे आहेत. लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जातात. हे उपचार करण्यापूर्वी त्यांची तपासणी करणे आवश्यक असते. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या मुलांची कोरोना चाचणी करून घेण्याबाबत सांगण्यात येते. परंतु, पालक घाबरून जातात. चाचणी करत नाहीत. यामध्ये वेळ जातो . योग्य वेळी तपासणी करून घेतल्यास उपचार करणे शक्य होते. सर्वांनाच कोरोनाची तीव्र लक्षणे असतात, असे नाही तर तीव्र लक्षणे असणाऱ्या मुलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता लवकरच तपासणी करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
...
मुलांमधील लक्षणे
-सर्दी
- खोकला
- घसा दुखणे
- सलग २ ते ३ दिवस ताप येणे
-पोटदुखी
- जुलाब लागणे
.....
तीव्र लक्षणे असलेल्या मुलांचे प्रमाण १ टक्का
कोरोनाची लक्षणे असलेली ९० टक्के मुले उपचार केल्यास बरे होतात. साधारण ९ टक्के मुलांना ॲडमिट करावे लागते. यापैकी १ टक्का मेले सिरियस होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता मुलांच्या तपासण्या कराव्यात. जेणे करून वेळेवर उपचार करणे शक्य होईल.
....
-पहिल्या लाटेत मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण नव्हते. परंतु, दुसऱ्या लाटेत घरातील व्यक्तींकडून मुलांना संसर्ग होत असून, १० ते २० वयोगटातील मुले कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, सलग २ ते ३ दिवस ताप आल्यास चाचणी करून घ्यावी. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी किती आहे, त्यानुसार उपचार करता येतात. डॉक्टरांनी चाचणी करायला सांगितल्यास घाबरून न जाता योग्य वेळी तपासणी करून उपचार करून घ्यावेत.
- डॉ. सुजित तांबोळी, बालरोग तज्ज्ञ
...
डमीचा विषय आहे.