मुस्लीम छायाचित्रकाराला बोलावू नका, शिवसेनेच्या माजी आमदाराचा अजब फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:49 PM2020-07-02T13:49:47+5:302020-07-02T13:49:55+5:30

महानगरपालिकेत छायाचित्र काढण्यासाठी गेलेले ‘लोकमत’चे छायाचित्रकार साजिद शेख यांना जातीधर्मवाचक शब्द वापरुन माजी आमदार अनिल राठोड यांनी छायाचित्र घेण्यास मज्जाव केला होता. राठोड यांच्या या वर्तनाबाबत पत्रकारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अहमदनगर प्रेस क्लबच्या सदस्यांनी निषेध केला आहे. 

Don't call a Muslim photographer, a strange fatwa of a former Shiv Sena MLA | मुस्लीम छायाचित्रकाराला बोलावू नका, शिवसेनेच्या माजी आमदाराचा अजब फतवा

मुस्लीम छायाचित्रकाराला बोलावू नका, शिवसेनेच्या माजी आमदाराचा अजब फतवा

अहमदनगर : मुस्लीम छायाचित्रकाराला फोटो काढण्यासाठी बोलावू नका, असा अजब फतवा शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी काढला आहे. त्यामुळे छायाचित्रकार, पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नगर शहरातील व्यापाºयांचे शिष्टमंडळ मंगळवारी (दि. ३०) दुपारी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. साजिद शेख यांना ही माहिती समजल्यानंतर ते छायाचित्र घेण्यासाठी गेले. यावेळी  राठोड हे आपल्या समर्थकांसह तेथे आले. शिष्टमंडळासोबत आयुक्तांच्या दालनात जाण्यापूर्वी ‘तुम्ही कोणता छायाचित्रकार आणला आहे,’ अशी विचारणा त्यांनी व्यापाºयांना केली. यावेळी व्यापाºयांनी शेख येथे आलेले आहेत, असे सांगितले. यावर राठोड यांनी शेख यांना उद्देशून जातीधर्मवाचक उल्लेख करत छायाचित्रे काढण्यासाठी आपली माणसेच बोलवत चला, असा अजब सल्ला व्यापाºयांना दिला. त्यांच्या या वर्तनाचा व्यापाºयांनाही धक्का बसला. विरोध केल्याने शेख छायाचित्र न घेता परत आले.  ‘अहमदनगर प्रेस क्लब’ला ही बाब लिखित स्वरुपात कळविण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्र्शींनी दिला दुजोरा
‘लोकमत’ने याबाबत राठोड यांना विचारणा केली असता ‘मी असे बोललो नसून तुमच्याकडे मी बोलल्याचा व्हीडिओ आहे का?’ असा पवित्रा त्यांनी घेतला. सोशल मीडियावर या घटनेचा निषेध सुरु होताच त्यांनी प्रेस क्लबकडे पत्र पाठवून आपण असे बोललोच नसल्याचा खुलासा केला आहे. 

दरम्यान, ‘लोकमत’ टीमने या घटनेची प्रत्यक्षदर्र्शींकडून माहिती घेतली असता राठोड यांनी जातीवाचक वक्तव्य करुन छायाचित्रकाराचा अवमान केल्याचा दुजोरा उपस्थितांनी दिला. कर्तव्यावर असणाºया छायाचित्रकाराला अशी वागणूक दिल्याने व्यापारीही हळहळले. 
--

 

Web Title: Don't call a Muslim photographer, a strange fatwa of a former Shiv Sena MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.