घरगुती समारंभ सुरू करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:07+5:302021-05-30T04:18:07+5:30
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि. २९) संगमनेर तालुक्याच्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. ...
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि. २९) संगमनेर तालुक्याच्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, यशोधन कार्यालयातील आरोग्य सेवक महेश वाव्हळ आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. तालुक्यात सध्या ५० गावे कोरोनामुक्त झाली आहे. मात्र, आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करावयाचा आहे. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोनाची साखळी तोडण्याचा उपाय असल्याचेही थोरात म्हणाले.
-------------------