पिचड पिता-पुत्रांना पक्षात घेऊ नका; जनआक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 03:29 IST2019-07-31T03:29:34+5:302019-07-31T03:29:40+5:30
भाजपला घरचा अहेर

पिचड पिता-पुत्रांना पक्षात घेऊ नका; जनआक्रोश मोर्चा
अकोले (जि.अहमदनगर) : आपल्या दुसऱ्या बिगर आदिवासी पत्नीला आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवून दिला. आदिवासींमध्ये घुसखोरी करुन गरीब आदिवासींची जमीन माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी बळकावल्याचा आरोप करुन त्यांना पक्षात घेऊ नका, अशी मागणी भाजपचे नेते अशोक भांगरे यांनी केली आहे. त्यामुळे पक्षाला घरचा अहेर मिळाला आहे.
पिचड यांचे पारंपरिक विरोधक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ, भिल्ल नाईक समाजाचे नेते अशोक माळी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ‘जनआक्रोश मोर्चा’ अकोले तहसीलवर धडकला. १५ आॅगस्टपर्यंत सरकारने कारवाई केली नाही, तर १७ आॅगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर रस्त्यावर उतरुन निदर्शने करु, असा इशारा भांगरे यांनी दिला.