डॉ. चिखले यांची गांजीभोयरे कोविड सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:53+5:302021-05-13T04:20:53+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील लोकनेते नीलेश लंके यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला विभागीय आयुक्त कार्यालयाचे ...
जवळे : पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील लोकनेते नीलेश लंके यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला विभागीय आयुक्त कार्यालयाचे डॉ. अर्जुन चिखले यांनी भेट दिली. येथील युवक दादाभाऊ झंझाड यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने कोविड सेंटर सुरू केले. चिखले यांनी येथे पाहणी करून सोयी-सुविधांबाबत चर्चा केली. त्यांनी येथे राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचेही कौतुक केले. कोरोना चाचण्या आणखी वाढवाव्यात त्यामुळे खऱ्या रुग्णांची संख्या समजेल, तसेच कोरोनाचा प्रसार थांबेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे, गटविकास अधिकारी, किशोर माने, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, सरपंच अनिता बाचकर, उपसरपंच आनंदा झंझाड, दादाभाऊ झंझाड, भास्कर बाचकर, संभाजी झावरे, डॉ. सोमेश्वर आढाव आदींची उपस्थिती होती.