डॉ.पवार यांच्या जयंती दिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:40+5:302021-07-07T04:26:40+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळामहादेव येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ.बाळासाहेब ...
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळामहादेव येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ.बाळासाहेब पवार यांच्या जन्म दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ.शकील सौदागर, अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ.अभिजीत पटारे, शिवा ट्रस्ट कॅम्पस डायरेक्टर पूनम बोधक, प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.प्रद्युमन इघे, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, शिवा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव आणि सुप्रिया दिदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या विद्या ठोकळ आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते.
डॉ.बाळासाहेब पवार हे शेतकरी पुत्र आहेत. अतिशय गरिबीतून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळविली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सलग तीन वर्षे पहिला क्रमांक मराठवाड्यात मिळविला. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालय सुरू केले. त्यांनी सुरुवातीला नर्सिंग कॉलेज सुरू केले आणि एकामागून एक वेगवेगळ्या कॉलेजची स्थापना केली. आज या पूर्वी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले आहे.
----------------