डाॅ. सायली लिपाणे एमडी परीक्षेत उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:45+5:302021-03-29T04:15:45+5:30
नेवासा : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (नाशिक) वतीने घेण्यात आलेल्या एमडी अंतिम वर्ष परीक्षेत सोनई (ता.नेवासा) येथील डाॅ. सायली ...
नेवासा : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (नाशिक) वतीने घेण्यात आलेल्या एमडी अंतिम वर्ष परीक्षेत सोनई (ता.नेवासा) येथील डाॅ. सायली संदीप लिपाणे यांनी यश प्राप्त करून पदवी प्राप्त केली आहे.
सोनईतील साईदीप मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचे संचालक संदीप लिपाणे यांच्या त्या पत्नी आहेत. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या (शेवगाव) आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सोनईत डाॅ. सायली लिपाणे या एमडी पदवी घेणाऱ्या
पहिल्या महिला डाॅक्टर ठरल्या आहेत.
डाॅ. लिपाणे यांना डाॅ. व्ही. डी. दिवे, डाॅ. प्रा. बी. टी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष योगदान देत भविष्यात महिलांचे स्वतंत्र शिबिर आयोजित केले जाईल, असे डाॅ. लिपाणे यांनी सांगितले.
--
२८ सायली लिपाणे