डॉ. शिंदे यांची कारकीर्द संस्मरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:07+5:302021-04-01T04:21:07+5:30
अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे हे ३३ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त आयोजित ...
अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे हे ३३ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त आयोजित निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
आंबरे पुढे म्हणाले, अकोले एज्युकेशन संस्थेच्या प्रगतीचा प्रासंगिक कारणाने लेखाजोखा स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत मांडताना ‘दोन जादूगार’, ‘शैक्षणिक चमत्कार’ शीर्षकाने डॉ. शिंदे यांनी लिहिलेला लेख आम्ही विसरूच शकत नाही. वर्तमानपत्रांतील त्यांचे चौफेर आणि प्रदीर्घ काळातील लेखन त्यांच्या अभ्यासू बाण्याचे प्रतीक आहे. एक तज्ज्ञ अभ्यासू प्राध्यापक म्हणून यापुढे महाविद्यालयात त्यांची जागा भरून निघणे आणि लाभणे कठीण म्हणावे लागेल.
सेक्रेटरी यशवंतराव आभाळे यांनी डॉ. शिंदे यांच्या संशोधकीय, तसेच दातृत्वगुणाचा उल्लेख केला. उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे यांनी प्रास्ताविकात डॉ. सुनील शिंदे यांच्या शैक्षणिक, साहित्यिक वाटचालीतील विविध पैलू नजरेस आणताना आजवर डॉ. शिंदे यांना लाभलेले अनेक राज्यस्तरीय पुरस्कार, तसेच त्यांच्या पुस्तकांचा नेमक्या शब्दांत परामर्श घेतला.
डॉ. शिंदे यांनी सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर संस्थेला कृतज्ञतापर देणगी निधी अध्यक्ष आंबरे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, खजिनदार एस.पी. देशमुख यांच्याकडे सुपुर्द केला. सहसचिव ॲड. भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस.पी. देशमुख, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे, पर्यवेक्षक बी.एच. पळसकर, प्रबंधक सी.आर. ढवळे, कार्यालय अधीक्षक सीताराम बगाड, बी.डी. मेहेत्रे, डॉ. अशोक दातीर, डॉ. विजय भगत, डॉ. शिवाजी खेमनर, डॉ. संपत सोनवणे, जी.जे. नवले, डॉ. ए.पी. झांबरे, हरीश कुसळकर उपस्थित होते.
३१अकोले