डॉ. विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्कार स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:09 PM2020-07-27T13:09:03+5:302020-07-27T13:09:54+5:30
लोणी : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्कार समारंभ कोवीड-१९ च्या पाशर््वभूमिवर स्थगित करण्यात आला असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्?यक्ष डॉ.रावसाहेब कसबे आणि कार्यक्रम संयोजन समितीचे समन्वयक व कारखान्याचे कार्यकारी सचांलक ठकाजी ढोणे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्?या निमित्ताने दरवर्षी साहित्य पुरस्कारांचे वितरण साहित्य संमेलच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात येते. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्?या जाणा-या या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्याची परंपरा मागील २९ वषार्पासुन प्रवरा परिवाराने कायम ठेवली आहे. यंदा पद्मश्रींचा १२० वा. जयंती दिन ३ आॅगस्ट २०२० रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहे. यावर्षी जयंती दिनाच्या निमित्ताने कोणतेही जाहीर कार्यक्रम न करता प्रवरानगर येथील स्मृतीस्थळावर अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावषीर्चे साहित्य व कला गौरव पुरस्कार एकत्रितपणे पुढील वर्षी देण्याचा निर्णयही पुरस्कार निवड समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीने घेतला आहे.