डॉ. विवेक दरंदले एमडी परीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:51+5:302021-03-31T04:21:51+5:30

सोनई : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या एमडी परीक्षेत सोनई येथील डॉ. विवेक विजय दरंदले यांनी यश ...

Dr. Vivek Darandale passed the MD exam | डॉ. विवेक दरंदले एमडी परीक्षा उत्तीर्ण

डॉ. विवेक दरंदले एमडी परीक्षा उत्तीर्ण

सोनई : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या एमडी परीक्षेत सोनई येथील डॉ. विवेक विजय दरंदले यांनी यश संपादन केले. कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालय, कोडोली येथे रसशास्त्र विभागातून डॉ. विवेक यांनी एमडी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले विभागप्रमुख डॉ. सुनील बकरे व डॉ. स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य ए. पी. दरंदले, जगन्नाथ दरंदले, संभाजी दरंदले, बाबूराव दरंदले, संचालक बनन दरंदले यांचा नातू असून सुधाकर दरंदले व प्राध्यापक डॉ. विठ्ठलराव दरंदले यांचे पुतणे आहेत.

.......................

कुंभार समाजाच्या वतीने कोविड हॉस्पिटलला मदत

जामखेड : डॉ. आरोळे हॉस्पिटलसाठी कुंभार समाजाचे नेते विठ्ठलराव राऊत व कुंभार समाजबांधवांनी शौचालयाच्या बांधकामासाठी पंच्याहत्तर हजारांची पंधरा हजार वीट तातडीने दिली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, नेते विठ्ठलराव राऊत, भागवत करडकर, संजीवन मेंढकर, अशोक करडकर, सतिश पालकर, नितीन यादव, विशाल राऊत, आण्णासाहेब देशमुख, रोहिदास देशमुख, कचरू करडकर, दिगांबर सोनवणे, बाळासाहेब वाघ, प्रवीण कुंभार, संजीव कुंभार, रेवणनाथ कुंभार उपस्थित होते.

...............................

तीन वर्षांपासून बंधाऱ्यास ग‌ळती

जवळे : पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील कुकडी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधार यास तीन वर्षांपासून प्लेटची खराब झाल्याने बंधाऱ्यात गळती लागली आहे. त्यामुळे बंधाऱ्याची साठवण क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु तीन वर्षांपासून कुकडी प्रकल्प अधिकाऱ्यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही बंधाऱ्याच्या प्लेट बसविण्या बाबत दुर्लक्षच केले आहे. लवकरात लवकर प्लेट न बसवल्यास नारायणगाव येथील कुकडी प्रकल्प कार्यालयात शेतकरी उपोषण करणार असल्याचे श्रीधर गाडीलकर व विकास दत्तात्रय गाडीलकर यांनी सांगितले.

.....................

पिंपळगाव जोगे कालव्याच्या प्रश्नी खासदारांची घेतली भेट

अळकुटी : पिंपळगाव जोगे कालव्याच्या पाणी प्रश्नी खासदार डाॅ. सुजय विखे लक्ष घालणार सोमवारी (दि. २९) अळकुटी येथील ग्रामस्थांनी खासदार डाॅ. सुजय विखे यांची भेट घेतली. पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी प्रश्नाबाबत कैफियत मांडली. अळकुटीसह अनेक गावांना अति कमी प्रमाणात पाणी देण्यात आले. पाबळ, रांधे, लोणीमावळा या गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला असताना खासदार विखे यांनी अळकुटी येथे पाटबंधारे विभागांचे आधिकाऱ्यांसह परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यासोबत ५ एप्रिलला बैठक बोलविली आहे. याप्रसंगी उपसरपंच शरद घोलप. ग्रामपंचायत सदस्य अरिफ पटेल, बाजीराव शिरोळे उपस्थित होते.

Web Title: Dr. Vivek Darandale passed the MD exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.