शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या डॉ. दिघावकरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:56 AM2021-02-20T04:56:25+5:302021-02-20T04:56:25+5:30
भिंगार : पिके खरेदी करून त्यांचा मोबदला न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जवळपास १२० कोटी रूपये मोबदला मिळवून देण्यात महत्त्वाची ...
भिंगार : पिके खरेदी करून त्यांचा मोबदला न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जवळपास १२० कोटी रूपये मोबदला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने पदक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. दिघावकर यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल त्यांचा ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी हा सत्कार नगरमध्ये केला.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अमित खामकर, प्रसाद कुलकर्णी, आकाश निऱ्हाळी, हेमंत ढाकेफळकर, कार्तिक स्वामी आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
१८ भिंगार
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करताना स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व इतर.