केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

By अरुण वाघमोडे | Published: June 9, 2023 04:27 PM2023-06-09T16:27:25+5:302023-06-09T16:27:51+5:30

यावेळी नगरसेवक शिंदे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्या.

Drainage water accumulated in Kedgaon Industrial Estate; Factory workers strike warning | केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

 अहमदनगर : केडगावच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये निर्माण झालेल्या ड्रेनेज लाइनच्या दुरवस्थेची पाहणी नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर व स्थानिक उद्योजक, कारखानदारांनी केली. यावेळी नगरसेवक शिंदे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्या.

यावेळी सतीश बोरा, नितीन पटवा, अरविंद गुंदेचा, नेहूल भंडारी, प्रमिला बोरा, राजेंद्र चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, सोनल चोपडा, प्रमोद बोरा, आनंद देसर्डा, योगेश मंत्री, अप्पासाहेब गावडे, संजय रांका, नरेंद्र चोरडिया, देवेंद्र गांधी, मनिष झंवर, अरुण झंवर, सुनील मुनोत, अजित कर्नावट, प्रणव कटारिया आदी उपस्थित होते.

केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट मधील कारखानदार, कामगारांनी अनेक महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेने या परिसरातील ड्रेनेज लाइनच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून काम बंद पडले आहे. त्यात झालेल्या पावसामुळे येथील ड्रेनेज लाइनची दाणादाण उडून घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरुन वाहताना परिसरात घाण पाण्याचे मोठे तळे साचले आहे. तर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

येथील कारखानदार, कामगार, महिला व स्थानिक नागरिकांना रस्त्यावरुन जाणे अवघड झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर अभियंता निंबाळकर यांनी हा प्रश्न पाच दिवसांत सोडविण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. पाच दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास कारखानदार, कामगार यांच्यासह नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिला.

Web Title: Drainage water accumulated in Kedgaon Industrial Estate; Factory workers strike warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.