तपकीर ओढा; कोरोना टाळा, भाजप नेते राजेंद्र नागवडे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:16 PM2020-03-12T12:16:23+5:302020-03-12T12:16:37+5:30
श्रीगोंदा : तपकीरीला उग्र वास असतो. त्यामुळे कोरोनाचा विषाणूही तेथे राहू शकत नाही. कोरोनाच्या लागण झालेल्या रूग्णांना या तपकिरीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का? याचा अभ्यास तज्ज्ञांनी करावा, असा सल्ला नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते राजेंद्र नागवडे यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी तंबाखू खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, केवळ तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही,असा अजब दावा करून खळबळ माजवून दिली होती. अशाच प्रकारचा तपकीर ओढल्याने कोरोनापासून दूर राहता येते, असा अजब दावा नागवडे यांनी केला आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध आले नाही. जगातील शास्त्रज्ज्ञ चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर नागवडे यांचा हा व्हीडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.राजेंद्र नागवडे यांनी स्वत:चा एक व्हीडिओ तयार करून सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यात नागवडे म्हणतात, जुन्या काळात तपकीर ओढली जायची. तपकिरीला उग्र वास असतो. त्यामुळे कोणताही विषाणू, जंतू त्यापुढे टिकाव धरू शकत नाही. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची चर्चा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर तपकिरीचा प्रयोग करून पहावा. कदाचित
यामुळे या रोगाला आळा बसू
शकतो. असा दावा नागवडे यांनी केले आहे.
--
काय असते तपकीर
तपकीर किंवा नस म्हणजे तंबाखूच्या वाळलेल्या पानांची भूकटी.
तपकीर ओढणे हे एक प्रकारचे व्यसन आहे.
१७ व्या शतकांत तपकीर ओढण्याचे व्यसन इंग्लंडमध्ये सुरू झाले. नंतरच्या काळात ते कमी होत आता बहुतेक नामशेष होत आले आहे.
श्रीमंत घराण्यातही सोन्या-चांदीच्या डबीत तपकीर ठेवली जायची.