बर्निंग डंपरचा थरार;चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:42 PM2021-02-13T17:42:12+5:302021-02-13T17:43:03+5:30

डंपरच्या मागील टायरमध्ये प्लास्टिकचा बारदाना अडकून झालेल्या घर्षणातून डंपरला आग लागली. लागलेल्या आगीतून डंपर जळाला. या घटनेत चालक मात्र, बचावला आहे. शुक्रवारी ( दि.१२ ) रात्री १२ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील सडे शिवारात हि घटना घडली आहे.

The driver of the burning dumper escaped | बर्निंग डंपरचा थरार;चालक बचावला

बर्निंग डंपरचा थरार;चालक बचावला

कोपरगाव : डंपरच्या मागील टायरमध्ये प्लास्टिकचा बारदाना अडकून झालेल्या घर्षणातून डंपरला आग लागली. लागलेल्या आगीतून डंपर जळाला. या घटनेत चालक मात्र, बचावला आहे. शुक्रवारी ( दि.१२ ) रात्री १२ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील सडे शिवारात हि घटना घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. त्याच्या भरावासाठी लागणाऱ्या मातीची सडे शिवारातून डंपरमधून रात्रंदिवस वाहतूक सुरु आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास दहा टायर डंपर ( एम एच ०४ जीसी ४२६७) वरील चालक डंपरमध्ये माती घेऊन जात होता.

 चालकाच्या बाजूच्या मागील टायरमध्ये प्लस्टिकचा बारदाना अडकला. डंपर चालत राहिल्यामुळे घर्षण झाले. या घर्षणातून आग लागली. जवळच डिझेलची टाकी असल्याने आगीचा भडका उडाला. भडक्यामुळे डंपरचे मागील चारही टायर जाळून खाक झाले.

Web Title: The driver of the burning dumper escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.