कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकावर चाकुने वार करुन 20 लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 08:17 PM2020-01-16T20:17:05+5:302020-01-16T20:17:37+5:30
घटना संगमनेर तालुक्यातील कोंची घाटात घडली.
अहमदनगर- आश्वी कडा जिल्हा बीड येथुन कापूस घेऊन जाणारा ट्रक चालकावर चाकुने वार करत ट्रकसह सुमारे वीस लाखांचा ऐवज लुटल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोंची घाटात घडली.
या बाबत ट्रक चालक भरत भगवान उंडे वय 26 राहाणार उंडेवाडी बीड येथुन मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच 16 ए वाय 8557 मध्ये बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी कापूस भरुन कडी जिल्हा म्हैसाना गुजरात येथील कापूस मिलला खाली करण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घोटी राज्यमार्गावर लोणीच्या पुढे रात्री 8.45च्या सुमारास मागुन पाठलाग करत आलेल्या विनाक्रमांकाच्या मोटरसायकल वरील दोघांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला.
संशय आल्याने ट्रक चालकाने ट्रक तसाच पुढे नेला असता मोटरसायकल वरील आरोपीनी कोंची घाटात ट्रकला मोटरसायकल आडवी लावत तु मागे गाडीला धडक दिली असल्याचे सांगत बळजबरीने एकाने ट्रक मध्ये प्रवेश करत मोटरसायकल ट्रक च्या पुढे घेतली सुमारे एक किलोमीटर पुढे गेल्यावर विनाक्रमांकाचा मोटरसायकलवर दोन जण आले असता पहिल्या मोटरसायकल वरील आरोपीने ट्रक मध्ये प्रवेश केला.
यानंतर ट्रक नाशिक महामार्ग वरील दोडी खु ता सिन्नर शिवारातील भारत पेट्रोल पंप समोर दुसऱ्या मोटरसायकल वरील दोघांनी प्रवेश करत चाकुने छातीवर वार करत मारहाण करून खिशातील आठहजार रुपये, मोबाईल काढुन घेत हातपाय बांधून मागे टाकुन अंगावर रग टाकला या नंतर ट्रक वळवुन रेल्वे गेट जवळुन वाकडीशिवारात जी पी एस सिस्टीम तोडुन टाकत .रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास शिर्डी येथे गेट नंबर दोन समोर आरोपीने चहा पिला या वेळी ट्रक चालकाने मला खुप त्रास होतो आहे. मला सोडा आशी विनंती केली असता आरोपीनी चालकाला साईबाबा रुग्णालया जवळ तीस रुपये देऊन खाली उतरून देत ट्रक सह पळ काढला.या वेळी ट्रक चालकाने पोलीस स्टेशन ला माहिती दिली.
शिर्डी पोलीसांनी घटनेची माहिती आश्वी पोलीस स्टेशन ला दिली असता आश्वी पोलीसांनी ट्रक चालकाच्या जबाबा वरुन सुमारे तेरा लाख रुपये किंमतीचा माल ट्रक सुमारे सातलाख रुपये किंमतीचा कापूस, आठ हजार रुपये रोख व मोबाईल असा सुमारे वीस लाखांचा ऐवज लुटीचा गुन्हा दाखल करत आरोपी च्या शोधात आश्वी पोलीस स्टेशन चेपथक रवाना झाले आहे.