निंबळक बायपासला ट्रक ड्रायव्हरचा भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:34 PM2019-12-31T13:34:23+5:302019-12-31T13:34:32+5:30
नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आाला. नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने ट्रकचा चालक होता.
अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आाला. नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने ट्रकचा चालक होता.
सदर ट्रक ड्रायव्हरचा खून मंगळवारी पहाटे झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. लामखेडे पेट्रोल पंपाच्या एक कि.मी. पुढे वळण रस्त्यावर ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. त्याच्या पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे व पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनास्थळी सारोळा कासारचे लोक जमा झाले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा ते शोध घेत आहेत. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणी अद्याप सुरू आहे.
ट्रकमधून दुधाची पावडर नेली जात होती. त्यामध्ये मोठ्या किंमतीचा माल होता. या व्यवसायामधूनच त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुधाची पावडर पुरवठा करण्याचा वलवे यांचा व्यवसाय होता, अशीही माहिती आहे.