रब्बीच्या ९५३ गावांना दुष्काळी सवलती
By Admin | Published: April 28, 2016 10:59 PM2016-04-28T22:59:58+5:302016-04-28T23:13:58+5:30
अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली
अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असून, या गावांना दुष्काळी सवलती गुरुवारी लागू करण्यात आल्या आहेत़ तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे़
खरिपाच्या ५८१ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे़ ही गावे सरकारने टंचाईसदृश जाहीर केली आहेत़ रब्बीच्या नजर पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील ४०८ गावांत गेल्या १० मार्च रोजी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता़ अंतिम पैसेवारीनुसार ९५३ गावांतील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ परंतु, या गावांना सरकारने सवलती जाहीर केल्या नव्हत्या़ त्या गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत़ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी विद्युतपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सूट, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि टँकरव्दारे पाणीपुरवठा, यासारख्या सवलती लागू झाल्या आहेत़
कुठे किती गावे
कोपरगाव-६३, श्रीरामपूर-५४, राहाता-३६, राहुरी-४४, नेवासा-११४, नगर-१०४, शेवगाव-७९, पाथर्डी-५४, पारनेर-८२, कर्जत-११८