फ्लेक्स फाडल्याने सुजयची खासदारकी जाणार नाही : राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:38 PM2019-05-30T17:38:42+5:302019-05-30T19:10:10+5:30
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याने त्यांची खासदारकी जाणार नाही.
संगमनेर : खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याने त्यांची खासदारकी जाणार नाही. याउलट आता काहीलोकांना भविष्याची चिंता लागली आहे. तालुक्यातीलच जनताच त्यांचा बंदोबस्त करील, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
विखे म्हणाले, राज्यात दुष्काळाची तीव्रता व पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकारने त्या पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. या भागातील नव्याने पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने करायचे त्यासाठी या भागातील निगरीकांचीही आपण लवकरच भेट घेणार असून, शेतक-यांना उत्पन्नाचे इतर कुठलेच स्त्रोत नसल्याने सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य शेतक-यांची आहे. येथील वरिष्ठ महाविद्यालय बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. ते विद्यालय पुन्हा सुरू व्हावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीने सुरू करण्यात येईल यासाठी मी लक्ष घालणार आहे. समाजात काही समाजकंटक असतात. त्यांना दुस-यांचा विजय मानवत नाही.पण आता तालुक्यातीलच जनता त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही शेवटी विखे-पाटील यांनी लगावला
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, मनसेचे किशोर डोके, काशिनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, प्रशांत आहेर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, संदीप आहेर, शिवाजी आहेर, सर्जेराव ढमढेरे, दिलीप आहेर, किशोर आहेर, शांताराम गाडेकर, सतीश धात्रक, डॉ.राहुल आहेर, अतुल आहेर, विशाल खोंड, सुनील आहेर, नितीन आहेर, यांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.