औैषध विक्रेत्यांना कोरोनावरील लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:01+5:302021-03-14T04:20:01+5:30
अहमदनगर : जागतिक संकट बनलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी आपला जीव धोक्यात घालून संकटकाळात आपली जबाबदारी यशस्वीपणे पार ...
अहमदनगर : जागतिक संकट बनलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी आपला जीव धोक्यात घालून संकटकाळात आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. औषधविक्रेते यांनीही आरोग्यसेवेचा एक दुवा म्हणून काम केले आहे. कोरोनोवरील लस देण्यासाठी नोंदणीकृत औषध विक्रेत्यांचा फ्रंटलाइन वर्कर म्हणून समावेश करण्याची मागणी शहर केमिस्ट असोसिएशननने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे केली आहे.
याबाबत शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केमिस्ट असोसिएशनने नेहमीच वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच कोरोना संकटाच्या काळामध्ये सर्व सामान्य रुग्णांना औषधाच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाच्या यादीमध्ये सर्व नोंदणीकृत केमिस्ट व्यावसायिकांना प्राधान्यक्रमाने समाविष्ट करून घ्यावे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, विशाल शेटीया, नितीन गांधी, आशुतोष कुकडे, भरत सुपेकर, मच्छिंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
--------
फोटो- १३ केमिस्ट असोसिएशन
कोरोनावरील लसीकरणासाठी औषध विक्रेत्यांचा प्राधान्यक्रमाने समावेश करण्याची मागणी केमिस्ट असोसिएशनने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करताना दत्ता गाडळकर. समवेत विशाल शेटीया, नितीन गांधी, आशुतोष कुकडे, भरत सुपेकर, मच्छिंद्र चौधरी आदी.