दारू खरेदीसाठी दुकानांसमोर मद्यप्रेमींची झुंबड, पहाटेपासून लांबच लांब रांगा: फिजिकल डिस्टन्सिगला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:15 AM2020-05-05T10:15:56+5:302020-05-05T10:16:50+5:30

अहमदनगर : प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्याने मंगळवारी (दि.5) पहाटेपासूनच जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती. ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारू खरेदीसाठी आतुर झालेल्या ग्राहकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना  पहिल्याच दिवशी हरताळ फासला.

Drunk lovers throng in front of shops to buy liquor, long queues from early morning: Physical distance strike | दारू खरेदीसाठी दुकानांसमोर मद्यप्रेमींची झुंबड, पहाटेपासून लांबच लांब रांगा: फिजिकल डिस्टन्सिगला हरताळ

दारू खरेदीसाठी दुकानांसमोर मद्यप्रेमींची झुंबड, पहाटेपासून लांबच लांब रांगा: फिजिकल डिस्टन्सिगला हरताळ

अहमदनगर : प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्याने मंगळवारी (दि.5) पहाटेपासूनच जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती. ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारू खरेदीसाठी आतुर झालेल्या ग्राहकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना  पहिल्याच दिवशी हरताळ फासला.

दोन ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर व एका दारू दुकानासमोर पाच ग्राहकांनापेक्षा जास्त जण उभा नको हा नियम कुठल्याच दारू दुकानासमोर पाळला गेलेला दिसला नाही. मंगळवारी सकाळी सकाळी दहा वाजता दुकानांमधून दारु विक्रीला सुरुवात झाली. मध्यप्रेमी मात्र पहाटेपासूनच दुकान उघडण्याची वाट पाहत होते.
जिल्हा प्रशासनाने 5 एप्रिल पासून जिल्ह्यातील मद्य विक्री दुकानांना परवानगी दिल्याचे सोमवारी रात्री जाहीर केले. अवघ्या काही मिनिटातच सोशल मीडियावर ही बातमी सर्वत्र व्हायरल झाली. मंगळवारी दारूची दुकाने उघडणार असल्याने अनेकांनी दारू खरेदीसाठी पहाटेपासूनच दुकानासमोर रांग लावली होती.   कंटेनमेंट झोन, शहरातील बाजारपेठा, मॉल व गर्दीची  ठिकाणे वगळता  इतर सर्व ठिकाणी ही दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत  सुरू राहणार आहेत.  मद्य  विक्रीची दुकाने सुरू असताना काही अटी व शर्ती प्रशासनाने घालून दिल्या  आहेत. त्यामध्ये दुकानासमोर पाच पेक्षा जास्त ग्राहकांनी उभे राहू नये,  दोन ग्राहकांमध्ये सहा फुटांपेक्षा जास्त अंतर हवे. प्रत्यक्षात मात्र दारूच्या दुकानांसमोर अनेक ठिकाणी मोठी झुंबड उडालेली दिसली, सहा फुटाच्या अंतराचा नियमही कुणी पाळला नाही. त्यामुळे दारू विक्री दरम्यान पहिल्याच दिवशी ग्राहकांनी नियमांना हरताळ फासला.
 
Web Title: Drunk lovers throng in front of shops to buy liquor, long queues from early morning: Physical distance strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.