मद्यधुंद तहसिलदाराचे परिचारिकेशी असभ्य वर्तन, अखेर कोपरगावात गुन्हा दाखल
By रोहित टेके | Updated: February 26, 2023 12:51 IST2023-02-26T12:51:06+5:302023-02-26T12:51:17+5:30
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात फिर्यादी परिचारिका शनिवारी रात्रपाळीला डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन रुग्णालयात आले.

मद्यधुंद तहसिलदाराचे परिचारिकेशी असभ्य वर्तन, अखेर कोपरगावात गुन्हा दाखल
रोहित टेके
कोपरगाव : कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेशी मद्यधुंद तहसीलदारांनी असभ्य वर्तणूक व शिवीगाळ केल्याची घटना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी(दि. २५) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी परिचारिकेच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बोरुडे असे गुन्हा दाखल झालेल्या तहसीलदारांचे नाव आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात फिर्यादी परिचारिका शनिवारी रात्रपाळीला डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन रुग्णालयात आले. व परिचारिकेस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर परिचारिकेने दिलेला डयुटी तक्ता फेकून दिला. तसेच परिचारिकेच्या मोबाईलवरून वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर कर्तव्यावर असलेले कक्षसेवक सचिन ठोंबरे यांना दवाखाण्याच्या बाहेर काढून दिले. त्यानंतर परिचारिकेच्या अंगावरून हात फ़िरवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तेथेच एका रुग्णांची नातेवाईक असलेल्या एका मुलीच्या अंगावरून देखील हात फिरवला व शिवीगाळ करीत निघून गेले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.