महिला ग्रामसभेत एरंडगावला दारूबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:02 PM2019-11-16T13:02:13+5:302019-11-16T13:02:50+5:30
गावातील अवैध दारू विक्री, अवैध धंदे बंद करण्याचा ठराव एरंडगाव समसूद (ता. शेवगाव) येथील महिला ग्रामसभेत सवार्नुमते मंजूर करण्यात आला.
वरूर : महिलांची सुरक्षितता आबाधित राहावी यासाठी गावातील अवैध दारू विक्री, अवैध धंदे बंद करण्याचा ठराव एरंडगाव समसूद (ता. शेवगाव) येथील महिला ग्रामसभेत सवार्नुमते मंजूर करण्यात आला.
एरंडगाव समसूद येथे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व विस्तार अधिकारी मल्हारी इसरवाडे यांच्या उपस्थितीत व सरपंच संतोष धस यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभा पार पडली.
यावेळी अनेक महिलांनी अवैध दारू विक्रीमुळे महिला व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे सांगितले. दारू पिऊन धिंगाणा घालणाºया व्यक्तींमुळे आम्हाला घराबाहेर पडणेही मुश्किल होते. गावात शांतता आहे. तरीही काही विघ्नसंतोषी व समाज कंटकांकडून वाईट बुद्धीने प्रेरित होऊन शांतता व जातीय सलोखा बाधित केला जातो, अशा शब्दांत महिलांनी व्यथा मांडल्या. त्यानंतर अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्याचा व संबधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचा ठराव सवार्नुमते मंजूर करण्यात आला. ग्रेसबाई योसेफ गजभीव यांनी हा ठराव मांडला. त्यावर शिलाबाई रामदास जगधने यांनी अनुमोदन दिले.
ग्रामसेविका आर. बी. झिरपे यांच्यासह माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ठरावाची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांनाही पाठविण्यात आल्याचे सरपंच संतोष धस यांनी सांगितले.