नेत्यांच्या हल्लाबोलमुळे प्रचाराला धार
By Admin | Published: October 9, 2016 12:36 AM2016-10-09T00:36:57+5:302016-10-09T01:04:30+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत अधिकृत उमेदवारी जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉर्नर सभांमधून आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
श्रीगोंदा : श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत अधिकृत उमेदवारी जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉर्नर सभांमधून आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
बाजार समिती निवडणुकीतील १८ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी ३८ उमेदवार, तर मतदारसंख्या २ हजार १६२, ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागांसाठी १६ उमेदवार, व्यापारी मतदारसंघात २ जागांसाठी १० उमेदवार, तर मतदार ६४४ आहेत. हमाल - मापाडी मतदार संघातील एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात असून, १०२ मतदार आहेत.
सत्ताधारी शिवाजीराव नागवडे, आ. राहुल जगताप, विरोधी बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार गटांत सामना रंगणार आहे. निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नेत्यांनी कॉर्नर सभा घेऊन परस्परांवर हल्लाबोल केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, बाळासाहेब महाडीक, दीपक भोसले, लक्ष्मण नलगे, अॅड. विठ्ठल काकडे, प्रतिभा पाचपुते यांनी लिंपणगाव गटाचा दौरा केला. बाजार समितीमधील भ्रष्टाचार व सत्तेसाठी एकत्र आलेल्या नेत्यांना त्यांनी ‘लक्ष्य’ केले.
शनिवारी आ. जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, अनिल वीर, धनसिंग भोयटे, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब नाहाटा, संजय जामदार यांनी बेलवंडी गटाचा दौरा केला. त्यांनी ‘पाचपुते’ यांना ‘लक्ष्य’ केले.
सेना नेते घनश्याम शेलार, संजय आनंदकर, प्रकाश निंभोरे, संतोष रायकर, भाऊसाहेब कोळपे, दत्तात्रय रायकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)