उन्हामुळे कावळ््यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

By Admin | Published: April 18, 2017 06:03 PM2017-04-18T18:03:17+5:302017-04-18T18:03:17+5:30

तापमानाचा पारा शिगेला पोहचल्याची जाणीव हुशार कावळ्यांना झाली आहे. दशक्रिया विधीसाठीच्या काकस्पर्शासाठी सकाळी नऊऐनजी दोन तास आधीच कावळे हजेरी लावत आहेत.

Due to the change of time, it's a time of change! | उन्हामुळे कावळ््यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

उन्हामुळे कावळ््यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

रीगोंदा : तापमानाचा पारा शिगेला पोहचल्याची जाणीव हुशार कावळ्यांना झाली आहे. दशक्रिया विधीसाठीच्या काकस्पर्शासाठी सकाळी नऊऐनजी दोन तास आधीच कावळे हजेरी लावत आहेत. यामुळे दशक्रिया विधीला येणारे नातेवाईक, नागरिक तसेच श्रध्दांजली वाहणाºया नेते मंडळींची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.हिंदू धर्मात दशक्रिया विधीतील काकस्पर्शाला विशेष महत्त्व आहे. मयत व्यक्तीच्या पिंडाला काकस्पर्श होण्यावर कुटुंब व नातेवाईकांचे मानसिक समाधान अवलंबून असते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता आहे. तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. या तापमानवाढीमुळे सकाळी दहा वाजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळतात. बाहेर पडल्यास उन्हापासून बचावासाठी घर अथवा झाडांचा आधार घेतला जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पशु- पक्ष्यांचा चारा व पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पक्षीसुध्दा लवकर बाहेर पडून सकाळी दहा वाजण्याच्या आत पुन्हा घरट्याकडे धाव घेत आहेत. उन्हाळ्यामुळे मयतांच्या नातेवाईकांनीही दशक्रिया विधीच्या वेळेत बदल करीत सकाळी सात वाजताच हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. दशक्रिया विधीचा कार्यक्रम लांबविला गेला तर काकस्पर्श न करता निघून जाण्याचे धोरण कावळ््यांनी अवलंबिले आहे. ज्या स्मशानभूमीत झाडे नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कावळे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात नागरिकांना बदल करण्याची वेळ आली आहे. विधी दोन तास लवकर होऊ लागल्याने श्रध्दांजली वाहणाºया नेते व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. उशिरा आल्यानंतर श्रध्दांजली वाहता येत नसल्याने कावळ्यांच्या वेळेनुसार यावे लागत आहे.——उष्णता वाढल्याने मनुष्य कामकाजाच्या वेळेत जसा बदल करतो त्याचप्रमाणे पशु-पक्ष्यांची दिनचर्या बदलते. उन्हापासून बचाव होण्यासाठी कावळे दशक्रिया विधीतील वेळेत बदल करू शकतात. त्यामुळे नागरिकांनीही दशक्रिया विधीच्या ठिकाणी पक्ष्यांसाठी झाडे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.-ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, जिवाजीराव शिंदे महाविद्यालय.

Web Title: Due to the change of time, it's a time of change!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.