विरोधकांनी संसदीय कामकाज चालू न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्ताधारी भाजपची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:21 PM2018-04-12T13:21:54+5:302018-04-12T13:23:41+5:30

मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले.

Due to the continuation of the parliamentary functioning of the opposition, the ruling BJP has taken the responsibility of the District Collectorate | विरोधकांनी संसदीय कामकाज चालू न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्ताधारी भाजपची धरणे

विरोधकांनी संसदीय कामकाज चालू न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्ताधारी भाजपची धरणे

ठळक मुद्देमानधन सरकारला परत देण्याचा निर्णय भाजप खासदारांनी घेतला

अहमदनगर : मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, बबनराव पाचपुते, अशोक खेडकर, नगर तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, कमलेश गांधी, गितांजली काळे, सुनील रामदासी आदींसह भाजपचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार गांधी म्हणाले की, संसदेचे कामकाज चालविणे ही देशवासियांप्रती लोकप्रतिनिधींची बांधिलकी असते. त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदीय कामकाजात महत्वपूर्ण मानले जाते. परंतु काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होण्यात बाधा आणली. विरोधकांच्या या आडमुठे धोरणामुळे लोकसभेचे कामकाज केवळ ४३, तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालले. म्हणजे दोन्ही सभागृहाचे एकूण तब्बल २४८ तास वाया गेले. विरोधकांच्या या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.
मानधन परत
विरोधी पक्षाच्या आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ दि. ०५ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीतील लोकसभेतील उपस्थिती भत्ता, मानधन सरकारला परत देण्याचा निर्णय भाजप खासदारांनी घेतला आहे. त्याप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनी लोकसभेच्या सचिवांना पत्र देत हे मानधन परत केले आहे.

Web Title: Due to the continuation of the parliamentary functioning of the opposition, the ruling BJP has taken the responsibility of the District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.