वारीत ‘डेंग्यू’मुळे विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Published: August 25, 2016 11:33 PM2016-08-25T23:33:37+5:302016-08-25T23:37:26+5:30
वारी : कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शाळकरी मुलाचा ‘डेंग्यू’ मुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. ‘डेंग्यू’ने बळी जाण्याची ही तालुक्यातील चौथी घटना आहे.
वारी : कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शाळकरी मुलाचा ‘डेंग्यू’ मुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. ‘डेंग्यू’ने बळी जाण्याची ही तालुक्यातील चौथी घटना आहे.
वारी गावातील समर्थ कैलास गोंडे (वय १९) हा विद्यार्थी कोपरगावला संजीवनी आय. टी.आय. मध्ये ‘इलेक्ट्रीशियन’ ट्रेडचे शिक्षण घेत होता. अचानक ताप येवून आजारी पडल्याने त्यास सुरवातीला तीन दिवस गावातील एका खासगी दवाखान्यात सलाईन देण्यात आले. रक्तव लघवीची तपासणी केल्यावर ‘टॉयफॉईड’चे निदान डॉक्टरांनी केले. परंतु उपचार चालू असूनही ताप उतरत नसल्याने दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले. त्यास आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ‘डेंग्यू’ असल्याचे निष्पन झाले. दरम्यान पांढऱ्या पेशी कमी झाल्याने समर्थला नाशिकला हलविण्याची तयारी चालू असताना बुधवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)