दुष्काळाच्या झळा : टँकरची द्विशतकाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:25 AM2018-11-22T11:25:22+5:302018-11-22T11:25:24+5:30
दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८२ टँकरने साडेतीन लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे.
अहमदनगर : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८२ टँकरने साडेतीन लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे.
यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आॅक्टोबरअखेरच टँकरने शंभरी पार केल्याने दुष्काळी स्थितीची प्रचिती येते. त्यानंतर नोव्हेंबरच्या २० तारखेपर्यंत टँकरचा आकडा १८२ वर पोहोचला आहे. सध्या आठ तालुक्यांमध्ये १४६ गावे व ७४८ वस्त्यांवरील ३ लाख ४९ हजार ५६० नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्वाधिक ७३ टँकर पाथर्डी तालुक्यात, त्यानंतर ३२ टँकर पारनेर, तर २६ टँकरने संगमनेर तालुक्याला पाणी दिले जात आहे. यासाठी १७ शासकीय व १६५ खासगी टँकर वापरले जात असून या सर्व गावांसाठी दररोज सुमारे ७० लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे.