दैव बलवत्तर म्हणून मंगलबाई बचावल्या, अंदाज चुकल्याने बिबट्या विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 08:54 PM2018-05-05T20:54:24+5:302018-05-05T20:54:34+5:30

शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी शिवारात ऊस तोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. मात्र ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या नजीकच्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिका-यांनी तब्बल आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

Due to fortune, Mangalbai survived, due to the prediction of the leopard well | दैव बलवत्तर म्हणून मंगलबाई बचावल्या, अंदाज चुकल्याने बिबट्या विहिरीत

दैव बलवत्तर म्हणून मंगलबाई बचावल्या, अंदाज चुकल्याने बिबट्या विहिरीत

शेवगाव : तालुक्यातील खामपिंपरी शिवारात ऊस तोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. मात्र ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या नजीकच्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिका-यांनी तब्बल आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
खामपिंपरी शिवारातील पैठण उजव्या कालव्या नजीक असलेल्या वितरीका क्रमांक पाच नजीक किसन पावसे यांच्या शेतात सध्या ऊस तोडणी सुरु आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ऊस तोडणी करणा-या मंगलबाई पवार (रा.लाडजळगाव) यांच्या अंगावर मागील बाजुने आलेल्या बिबट्याने झडप घातली. मात्र याच वेळी ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या जवळच असलेल्या विहिरीत पडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून मंगलबाईचा जीव वाचला. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. खामपिंपरीसह नजीकच्या पिंगेवाडी, मुंगी, हातगाव येथील शेतकरी व नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिक, शेतक-यांनी धावपळ करुन बाज पाण्यात सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती वनविभागाला मिळताच शेवगावचे वनपाल सी.ए. रोडे, पाथर्डीचे एम. बी. राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी विहिरीतील बिबट्याला बाजाच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

Web Title: Due to fortune, Mangalbai survived, due to the prediction of the leopard well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.