गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सला वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:26 AM2021-09-16T04:26:41+5:302021-09-16T04:26:41+5:30

अहमदनगर : कोरोनाची भीती आणि बंधनकारक करण्यात आलेल्या चाचण्यांमुळे प्रवाशांची गर्दी ओसरली होती; परंतु, गणेशोत्सवाच्या काळात सुटी असल्याने ट्रॅव्हल्सना ...

Due to Ganeshotsav, travels have become more crowded | गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सला वाढली गर्दी

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सला वाढली गर्दी

अहमदनगर : कोरोनाची भीती आणि बंधनकारक करण्यात आलेल्या चाचण्यांमुळे प्रवाशांची गर्दी ओसरली होती; परंतु, गणेशोत्सवाच्या काळात सुटी असल्याने ट्रॅव्हल्सना पुन्हा गर्दी वाढली आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय पूर्वपदावर येण्यास दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद आहे. पहिल्या लाटेनंतर पर्यटन सुरू झाल्याने ट्रॅव्हल्सला गर्दी वाढली होती. परंतु, दुसरी लाट येऊन धडकली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र होती. दुसरी लाट काहीशी ओसरली आहे; परंतु, नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. त्यात राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. तसेच नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्या पूर्णपणे कमी झालेली नाही. शहरासह ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कामाशिवाय कुणी फिरत नाही. कामानिमित्त जाणारेच फक्त ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. परंतु, गणेशाेत्सवाच्या काळात शासकीय सुट्ट्या असल्याने नागापूर, बडोदा, आदी ट्रॅव्हल्सना गर्दी पाहायला मिळाली. औरंगाबाद ते पुणे, नाशिक या जिल्ह्यांत जाणाऱ्या ट्रॅव्हल्सही गर्दी होऊ लागली असून, कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवाळीपर्यंत घट झाली तरच हा व्यवसाय पूर्ववत होईल, अन्यथा पुन्हा प्रवासीसंख्या कमी होईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

....

या मार्गावर सर्वाधिक गर्दी

नगर ते नागपूर

नगर ते गोवा

नगर- इंदाैर

....

शिर्डी बंदचा फटका

देश-विदेशांतून साईभक्त शिर्डी येथे येत असतात. परंतु, साईमंदिर बंद असल्यामुळे हैदराबादसह अन्य राज्यांतून येणाऱ्या बसेस बंद आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायाला मोठा फटका बसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

....

- कोरोनाची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडत नाहीत. पुढील काळातील ऑफरबाबत विचारणा केली जात आहे. पण, बालाजीला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तसेच कामानिमित्त नागरिक इतर देशांतही जाऊ लागले आहेत. परंतु, हे प्रमाण अत्यल्प आहे. दिवाळीनंतर काय परिस्थिती राहते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे.

- किशाेर मरकड, अध्यक्ष अहमदनगर टुरिझम फोरम

....

डमी क्रमांक ११८६

..

Web Title: Due to Ganeshotsav, travels have become more crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.