कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ‘हे परिसर’ झाले कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 07:00 PM2020-05-30T19:00:56+5:302020-05-30T19:02:03+5:30
अहमदनगर : कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने संगमनेर शहरातील काही भाग, राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे, तर नगर शहरातील सथ्था कॉलनी परिसर कंटेन्मेंट झोन व त्याच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केला आहे.
अहमदनगर : कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने संगमनेर शहरातील काही भाग, राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे, तर नगर शहरातील सथ्था कॉलनी परिसर कंटेन्मेंट झोन व त्याच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवेसह इतर सर्वच वस्तू विक्री, दुकाने या भागात १२ जूनपर्यंत बंद ठेवावेत, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत.
संगमनेर शहरात शनिवारी पाचजण कोरोनाबाधित रूग्ण आढळले. याशिवाय शुक्रवारी राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे येथे एका भाजीविक्रेत्या महिलेला कोरोना झाल्यानंतर तिच्या संपर्कातील तिच्याच कुटुंबात सहाजण बाधित आढळले. शनिवारी नगर शहरातील सथ्था कॉलनीतील ५ जण पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रूग्ण ज्या भागात आढळले त्या भागात कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री व इतर सर्व दुकाने बंद राहतील. येथे प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जाईल. कंटेन्मेंट झोनच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून घोषित केला असून तेथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहणार आहेत.
--------------------------
१) संगमनेर
कंटेन्मेंट झोन : भारतनगर, रहिमतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्ती.
बफर झोन : जुना जोर्वे रोेड, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती.
२) निमगाव कोºहाळे
कंटेन्मेंट झोन : अण्णाभाऊ साठेनगर, क्रांती चौक, वेसजवळील गावठाण, आंबेडकर स्मारक जवळील वस्ती, एकलव्य नगर, इंदिरा वसाहत, कातोरो वस्ती, साईनाथ हौंसिग सोसायटी, चांगदेवनगर, सुलाखेनगर, यमुुनानगर, विजयानगर, देशमुख चारीखालील भाग, रेस्टहाऊस रोडपासून उत्तर बाजू.
बफर झोन : निघोज गावठाण सर्व.
३)सथ्था कॉलनी, नगर
कंटेन्मेंट झोन : स्टेशन रोड, सिद्धेश मोटर्स, जुने कैलास हॉटेल, डॉ. खालकर हॉस्पिटल, कोठी रोड, हेमराज केटरर्स, मारूती मंदिर, पुंड यांचे घर, कृषी उत्पन्न बाजार समितीची पूर्वेकडील भिंत ते स्टेशन रोड.
बफर झोन : भुसार बाजार आवार, तुळजाभवानी मंदिर, पांजरपोळ संस्थेचे गाळे, वायएमसीए संस्थेचे मैदान, कोठी रोड पूर्व बाजू, अरिहंत सोसायटी, पूनम मोतीनगर.