महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले - प्रल्हादसिंग पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 14:47 IST2023-06-24T14:46:13+5:302023-06-24T14:47:30+5:30
प्रल्हादसिंग पटेल : लोकसभा प्रवास योजना, संगमनेरात ‘चाय पे चर्चा’

महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले - प्रल्हादसिंग पटेल
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : संपूर्ण देशात जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले. परंतू आता योजनेतील गती पाहता प्रत्येक घरात पाणी देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत शनिवारी (दि. २४) शिर्डी लोकसभा मतदार संघातील संगमनेरात केंद्रीय मंत्री पटेल यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधला. येथील बसस्थानकात त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहीती दिली. आमदार डॉ राहुल आहेर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, योगीराज परदेशी, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ.अशोक इथापे, राम जाजू, अमोल खताळ आदी उपस्थित होते.
देशातील प्रत्येक नागरिकाला घर, शौचालय, मोफत अन्नधान्य आणि वैद्यकीय उपचार अशा योजनांची अंमलबाजवणी संपूर्ण देशात सुरू आहे. किसान सन्मान योजनेबरोबरच नव्या शिक्षण नीतीमुळे उद्योग आणि व्यापारी क्षेत्रात बदलांचे परिणाम पाहायला मिळत आहेत. असेही केंद्रीय मंत्री पटेल म्हणाले.