छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमले नगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:59 AM2021-02-20T04:59:38+5:302021-02-20T04:59:38+5:30
विविध सामाजिक संघटना व मिंत्रमंडळांच्यावतीने जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण शिवमय झाले होते. ...
विविध सामाजिक संघटना व मिंत्रमंडळांच्यावतीने जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण शिवमय झाले होते. चौकाचौकात छत्रपतीची प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
शहरातील माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक-मालक संघटनेच्या जयंतीनिमित्त अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. बहुजन समाज पार्टीच्यावतीने जयंतीनिमित्त शहरातील जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसर व बहुरी चाळ येथे मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, विजय गायकवाड, विक्रम गायकवाड, राहुल कसबे, सागर पोळ आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------
नगर शहरातील नालेगाव येथे अंतिम चौक मित्र मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नीलेश पोटे, उपाध्यक्ष मनोज कोंडगे, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नालकांडे, अजय चितळे, मनोज कोतकर, मराठा सेवा संघाचे विठ्ठल गुंजाळ, रामकृष्ण कर्डिले, अँड. संतोष गायकवाड, सुरेखा सांगळे, संध्या मेढे, गजेंद्र दांगट, गिरीश भामरे, बाबासाहेब वामन आदी.
फोटो १९ जयंती
------------------------------
नगर शहरातील जुने बसस्थानक येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, ॲड. शिवाजी कराळे, शाहिर कान्हू सुंबे आदी.
फोटो १९ जयंती २
----------------------------
लहुजी शक्ती सेनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट समवेत दत्ता वामन, फरहान शेख, संदीप सकट, अजहर शेख, महेंद्र वाघुंडे, सोहेल शेख, निहाल शेख, कुनाल हरबा, शुभम ढोबळे, प्रसाद सकट आदी.
फोटो १९ जयंती ३
------------------------------------
अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक-मालक संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अनामप्रेम संस्थेमधील दिव्यांग मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास देवरे, सुदाम देशमुख, रामभाऊ नळकांडे, किरण बोरुडे, अतुल लहारे, भाऊसाहेब भाकरे, अजय चितळे, बाळासाहेब वामन, दत्ता वामन, अशोक औशिकर, विलास कराळे, संजय गवळी, गणेश आटोळे, नीलेश कांबळे, सुनील सकट, गणेश गायकवाड, धन्ना उजागरे आदी.
फोटो १९ जयंती ४
------------------------------------------------
भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ,युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, विशाल बेलपवार, अर्जुन बेरड, दिलीप ठोकळ आदी.
फोटो १९ जयंती ५
------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व
मार्केटयार्ड टेम्पो असोसिएशनच्यावतीने मार्केटयार्डमधील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेसमवेत सचिव अभय भिसे,
उपसचिव बाळासाहेब लबडे, जयसिंग भोर, सचिन सातपुते, मनोज कोतकर, टेम्पोचालक,
अधिकारी व कर्मचारी.
फोटो १९ जयंती ६