कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

By Admin | Published: May 18, 2014 11:33 PM2014-05-18T23:33:32+5:302024-04-10T11:39:57+5:30

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून

Dump rubbish: Water tightening | कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून, वारंवार मागणी करून देखील प्रशासनाला पाझर फुटत नाही़ त्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत़ नगरचे अर्थकारण उद्योगावर अवलंबून आहे़ बड्या उद्योगांवर ५०० छोटे उद्योग तग धरून आहेत़ काही मोठे उद्योगांचे बॉयलर थंडावले आहेत़ रोजगाराच्या संधीही जेमतेम आहेत़ उद्योगाला मरगळ आली आहे़ आधीच उद्योगासाठी पोषक वातावरण नाही़ त्यात पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ उद्योगांनाही विविध समस्यांनी घेरले आहे़ कंपनीत निर्माण होणारा कचरा रस्त्यावर पेटविला जातो़ कंपनीतील थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या,कागद, पॅकिंगचे साहित्य यासारख्या कचर्‍याचा ढीग रस्त्याच्या बाजूला साचला आहे़ किमान कंपनीतील टाकाऊ वस्तुंचे संकलन करणे,कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ही कामं करावीत,अशी उद्योजकांची अपेक्षा आहे़ मात्र कचर्‍याचे संकलन करणारी यंत्रणा उपलब्ध नाही़ कचरा संकलनाचे काम होत नाही़ उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल केला जातो़ परंतु त्याबदल्यात सुविधा पुरविल्या जात नाहीत़ पायाभूत सुविधासाठी उद्योजकांचा लढा अजूनही सुरूच असून,प्रशासनाला मात्र पाझर फुटत नाही़ उद्योजकांनी याविषयी निवेदने दिली़परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही़ त्यामुळे या समस्यात वाढच होत आहे़ लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्योजकांना लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली आहेत़ पण त्यावर कोणतीच कार्यवाही न झाली नाही़ त्यामुळे उद्योगाला कुणीच वाली नाही, अशी भावना उद्योजकांची झाली आहे़ (प्रतिनिधी) पथदिव्यांअभावी एमआयडीसीत अंधाराचे साम्राज्य बहुतांश कंपन्या चोवीस तास सुरू असतात़ रात्रीच्यावेळी कंपन्यांतील कामगारांची ये-जा सुरू असते़ रस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले आहेत़ परंतु पथदिव्यांची दुरवस्था झाली असून,ते बंद असतात़ त्यामुळे औद्योगिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असते़ याकडे प्रशासनाचे वेळोवळी उद्योजकांनी लक्ष वेधले़ परंतु याकडे प्रशासनाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले असून, प्रकाश व्यवस्था नसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़ कचरा रस्त्यावर कंपनीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो़ टाकाऊ वस्तू रस्त्यावर सर्रास टाकल्या जातात़ बहुतांश कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर कचर्‍यांचे ढीग पाहायला मिळताता. थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. हा कचरा जागेवरच कुजून दुर्गंधी सुटली आहे. कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने कचर्‍यांचे ढीग वाढतच आहेत. त्यामुळे एमआयडीसीची बकाल अवस्था झाली आहे. या दुर्गंधीने कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचर्‍याचे संकलन करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.

Web Title: Dump rubbish: Water tightening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.