कोरोना काळात रेड क्रॉसने समाजोपयोगी उपक्रम राबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:34+5:302021-02-10T04:20:34+5:30
प्रांताधिकारी पवार म्हणाले, सर्वांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याची निवडणुकीपूर्वी खात्री करावी. त्यासाठी बीएलओची नियुक्ती करण्यात आली ...
प्रांताधिकारी पवार म्हणाले, सर्वांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याची निवडणुकीपूर्वी खात्री करावी. त्यासाठी बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा.
प्रास्ताविक व स्वागत रेड क्रॉस सचिव सुनील साळवे यांनी केले. यावेळी स्पर्धेतील विजेते अरुण सोनवणे, प्राजक्ता मुळे, ज्ञानेश्वरी क्षीरसागर,डॉ. सुभाष गल्हे, नम्रता वर्मा, शीतल थेटे, पूजा थोरात, अविनाश काळे, मयूर मुनोत आदींना सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांनी रेड क्रॉसच्या उपक्रमाचे कौतुक केले. आदर्श शिक्षक शोभा शेंडगे, प्रा.डॉ. प्रतिभा विखे, अश्विनी लबडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील साळवे, प्रवीण साळवे, प्रमोद पत्की, भरत कुंकुलोळ, दादासाहेब साठे, बाळासाहेब सोनटक्के, संतोष जाधव, प्रकाश जाधव, पोपट शेळके, सुखदेव शेरे आदींनी परिश्रम घेतले.
------