दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान, अनेक भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 04:38 PM2022-11-11T16:38:17+5:302022-11-11T16:39:00+5:30
Sai Baba : दिवाळी व सुट्यांमध्ये विक्रमी गर्दी असते. यंदा दिवाळीत २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
शिर्डी : नुकत्याच सरलेल्या दिवाळीत भाविकांनी साईबाबांना तब्बल अठरा कोटींची दान अर्पण केले आहे. साईदर्शनासाठी दरवर्षी अडीच कोटींहून अधिक भाविक साईदरबारी हजेरी लावतात. दिवाळी व सुट्यांमध्ये विक्रमी गर्दी असते. यंदा दिवाळीत २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पंधरा दिवसात भाविकांनी १७ कोटी ७७ लाख ५३ हजारांचे दान साईबाबांना अर्पण केल्याची माहिती संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली.
मिळालेल्या दानात दक्षिणा पेटी तीन कोटी ११ लाख ७९ हजार, देणगी काउंटर सात कोटी ५४ लाख ४५ हजार, ऑनलाइन देणगी एक कोटी ४५ लाख ४२ हजार, चेक, डीडी देणगी तीन कोटी तीन लाख ५५ हजार, मनीआर्डरद्वारे सात लाख २८ हजार, डेबिट- क्रेडिट कार्ड देणगी एक कोटी ८४ लाख २२ हजार.
सोने- ८६०. ४५० ग्रॅम, किंमत- ३९ लाख ५३ हजार, चांदी- १३,३४५. ९७० ग्रॅम, किंमत पाच लाख ४५ हजार, परकीय चलन- २९ देशांतील परकीय चलन- २४ लाख ८० हजार असा समावेश आहे.