वीज पडून कालवडीचा मृत्यू
By Admin | Published: June 9, 2017 02:35 PM2017-06-09T14:35:52+5:302017-06-09T14:35:52+5:30
आश्वी व परिसरातील गावांमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उंबरी-बाळापूर येथे वीज पडून कालवडीचा मृत्यू झाला़
आॅनलाईन लोकमत
आश्वी, दि़ ९ - संगमनेर तालुक्यातील आश्वी व परिसरातील गावांमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उंबरी-बाळापूर येथे वीज पडून कालवडीचा मृत्यू झाला़
आश्वी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे़ वीजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली़ चणेगाव, निमगावजाळी, मांची, उंबरी-बाळापूर, ओझर या गावांमध्ये पावसाने शुक्रवारी जोरदार हजेरी लावली़ उंबरीबाळापूर शिवारातील ओझर शिवेलगत असलेल्या शिंदे वस्तीवरील शेतकरी सुदंरबापु बाळासाहेब शिदें यांची कालवड व इतर जनावरे घराबाहेर बांधलेले होते़ अचानक आकाशातून विजेचा लोळ कालवडीवर पडला़ यात कालवड गंभीर जखमी झाली़ शिंदे यांनी गावातील खाजगी डॉ. अनिल सारबंदे यांना उपचारासाठी बोलावले होते. परंतू उपचारापूर्वीच कालवडीचा मृत्यू झाला़ यात त्यांचे साठ हजार रुपयाचे नुकसान झाले़ शुक्रवारी घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी तांबे, तलाठी माधुरी नामदे, पोलिस पाटील शरद काबंळे, बापू बर्डे, संजय मैड यांनी घटनास्थळी भेट देत पचंनामा केला़ शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परिसरात सुमारे एक तास दमदार पाऊस झाला़