शिस्त मोडणा-यांना पक्ष भूईसपाट करतो - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:50 PM2018-03-30T17:50:32+5:302018-03-30T17:54:13+5:30
आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर : जो शिवसेनेचा पदाधिकारी शिस्त मोडण्याचे काम करतो, त्यांना पक्ष भूईसपाट करतो. शिवशेनेची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे. आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पाच कोटी रुपयांच्या पळसपूर ते पोखरी रस्ता व कामटवाडी, खडकवाडी व वारणवाडी येथील नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत तीन बंधा-यांच्या विकास कामांच्या भूमिपजनप्रसंगी गुरुवारी खडकवाडी (ता. पारनेर) येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पारनेर तालुक्याचे आमदार विजय औटी हे होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, अशोक कटारिया, विकास रोहोकले, श्रीकांत पठारे, शिवाजी बेलेकर, राजेश भनगडे, बाबासाहेब तांबे, राहुल झावरे, सुरेश बोरुडे, ताराबाई चौधरी, उमाताई बोºहुडे, सुनीता झावरे, अप्पासाहेब शिंदे, साहेबराव वाफारे, ज्ञानदेव गागरे, किसनराव ढोकळे, अमोल रोकडे, डॉ.सुदाम आहेर, धनंजय ढोकळे, छायाताई शिंदे, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, औटी यांनी पारनेर तालुक्याचा कायापालट करण्याचा चंग बांधला असून तालुक्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यात यशस्वी झाले आहेत. नदी पुनर्जीवन प्रकल्पाची संकल्पना औटी यांची आहे. मग राज्यात अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली. शासनाचा इतर निधी कसा आणायचा? कसा खर्च करायचा? याचा ताळमेळ व न्याय देण्याचे काम औटी करतात. त्यामुळे त्यांना जनतेने तीन वेळेस निवडून दिले, असे ते म्हणाले.
रस्त्यांच्या कामांसाठी २२ कोटींचा निधी आणला आहे. यापुढील काळात पण अशीच विकास कामे करण्याचा माझा कायम प्रयत्न राहील, असे आमदार विजय औटी यांनी सांगितले.