रोजगारक्षमता वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:20 AM2021-03-19T04:20:07+5:302021-03-19T04:20:07+5:30
मुंबई येथे दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या विशेष बैठकीमध्ये हा सामंजस्य करार प्रारंभिक दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्वाक्षरित करण्यात आला. यावेळी आरसीएफ ...
मुंबई येथे दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या विशेष बैठकीमध्ये हा सामंजस्य करार प्रारंभिक दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्वाक्षरित करण्यात आला. यावेळी आरसीएफ कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयाच्या मानवसंसाधन विभागाचे कार्यकारी संचालक एन.एच. कुराणे, उपमहाप्रबंधक शरद सोनावणे व सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे उपस्थित होते.
आरसीएफ व सीएसआरडी संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, यामध्ये एसएपी-ईआरपी डोमेन व सॉफ्टवेअर प्रशिक्षण आयोजित करणे, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना करिअर विकासासाठी विविध संधी उपलब्ध करून देणे, कॉर्पोरेट प्रायोजकत्वच्या माध्यमातून सहयोग देणे, शैक्षणिक भागीदारीच्या माध्यमातून संसाधन निर्मिती करणे, विविध विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान- प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करून ज्ञानाचा प्रसार करणे, स्त्री- पुरुष समानता व महिला सशक्तीकरण यावर प्रबोधनपर प्रशिक्षण आयोजित करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करून कार्यक्षमता वाढविणे, संयुक्त साहित्य प्रकाशित करणे या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यावसायिक कौशल्ये व मूल्ये विकसित होऊन त्यांच्यासाठी व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे.
सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी सांगितले की, व्यावसायिक समाजकार्य क्षेत्र सद्य:स्थितीत अधिक गतिमान होत चालले असून, विषयाची समस्या हाताळण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान व कौशल्य सामाजिक कार्यकर्त्यांकडे असणे आवश्यक आहे. म्हणूनच, या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी जागतिक दर्जाची, सक्षम, धोरणात्मक; पण लवचीक दृष्टिकोन आणि कल्पक व्यवस्थापकीय गुणवत्ता तयार करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाने आरसीएफसारख्या नामांकित कंपनीशी केलेल्या भागीदारीद्वारे परिकल्पित असे परस्पर फायदे होणार असून, त्यामुळे समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चौकटीपलीकडे जाऊन ज्ञान मिळविण्यास फायदा होणार आहे.
१८ कुराणे