शैक्षणिक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:32+5:302021-03-04T04:36:32+5:30
श्रीरामपूर : मौलाना आझाद महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना सुरू झाली असून, या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे ...
श्रीरामपूर : मौलाना आझाद महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना सुरू झाली असून, या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. येथील बागवान, आतार, तांबोळी, रंगरेज, काकर, कुरेशी, अन्सारी, पिंजारी समाजाच्या प्रमुखांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात योजना नव्याने सुरू केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. निवेदनावर फय्याज बागवान, इक्बाल काकर, इब्राहिम बागवान, शफीक बागवान, नजीर मुलानी, अबू कुरेशी, रज्जाक बागवान, रफीक बागवान, अकबर बागवान, रफीक बागवान, जाकीरहुसेन बागवान आदींच्या सह्या आहेत.
-------