अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या प्रभावी उपाययोजना-मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:06 PM2019-05-10T18:06:10+5:302019-05-10T18:06:14+5:30

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिली.

 Effective measures for the prevention of drought in Ahmednagar district - Chief Minister | अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या प्रभावी उपाययोजना-मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या प्रभावी उपाययोजना-मुख्यमंत्री

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिली.
जिल्ह्यातील १३ तालुक्यात ७७२ टँकरने पाणीपुरवठा सुरुआहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात ४ नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती केली असून ५४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १०.४९ कोटी रुपयांच्या थकित वीज देयकाची रक्कम भरून पाणी पुरवठा सुरळित करण्यात आला. जिल्ह्यात ७ तालुक्यात ४९३ शासकीय चारा छावण्या सुरु असून यामध्ये २ लाख ६७ हजार ५७४ मोठी तर ४१ हजार ९१७ लहान अशी मिळून ३ लाख ०९ हजार ४९१ जनावरे दाखल आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या ११ तालुक्यातील १२७५ गावातील ६ लाख ३६ हजार ७९० शेतक-यांना ४००.५४ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना चारा चालकांची देयके अदा करण्यासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ४९ हजार २९२ शेतक-यांनी पिक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसानभरपाई पोटी १४७.१५ कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी ९० कोटी रुपयांची रक्कम १ लाख ६५ हजार ४४९ शेतक-यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २.७२ लाख शेतक-यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ५८ हजार शेतक-यांना प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी ११.५६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. उर्वरित शेतक-यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८८६ कामे सुरु असून त्यावर ७५१२ मजुरांची उपस्थिती आहे.

Web Title:  Effective measures for the prevention of drought in Ahmednagar district - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.