इंधन दरवाढ टाळण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:56 AM2021-02-20T04:56:49+5:302021-02-20T04:56:49+5:30
अहमदनगर : भारतात पेट्रोल-डिझेलची ९० टक्के आयात करावी लागते. कोरोनामुळे आयात आणि वाहतूक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच सध्या ...
अहमदनगर : भारतात पेट्रोल-डिझेलची ९० टक्के आयात करावी लागते. कोरोनामुळे आयात आणि वाहतूक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच सध्या इंधनाची दरवाढ झाली असावी, अशी शक्यता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ते म्हणाले, पूर्वी इंधनाच्या दरात हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार होता. मात्र, मागील युपीए सरकारच्या काळात त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे दर ठरविणारी पेट्रोलियम कंपन्यांची स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आली. त्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, यात जनतेच्या रोषाला सरकारलाच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता यात हस्तक्षेपाचा अधिकार केंद्र सरकारला पुन्हा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. येत्या अधिवेशनात हा मुद्दा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय होऊ शकतो.
आपल्याला कच्चे तेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. कोरोना काळात ही सर्व यंत्रणा प्रभावित झाली. वाहतूक आणि अन्य प्रकारचे खर्चही वाढले. त्यामुळे ही मोठी दररवाढ झाली असावी. नेमके काय होत आहे, ते संबंधित कंपन्यांचे अधिकारीच सांगू शकतील.