जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी, बरे होणा-यांचे प्रमाण 80 टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 02:20 PM2020-06-15T14:20:37+5:302020-06-15T14:20:51+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.
अहमदनगर: जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.
या आठमध्ये संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
कोरोना झालेल्या रुग्णांची संख्येमध्ये बरे होणा-यांचे प्रमाण 80 टक्के आहे. हा एक मोठा दिलासा आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 258 एवढी आहे. त्यामध्ये बरे झालेल्यांची ही संख्या 206 एवढी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचे हे प्रमाण 80 टक्के आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.