संगमनेरात आठ गोवंश जनावरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:44+5:302021-04-21T04:20:44+5:30
रियाज अहमद अब्दुल रहिम शेख (रा. निंबाळे, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल ...
रियाज अहमद अब्दुल रहिम शेख (रा. निंबाळे, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जमजम कॉलनी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून ठेवली असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मिळाली. पोलिसांचे पथक
कारवाईसाठी गेले असता त्यांना रियाज अहमद अब्दुल रहिम शेख याने जमजम कॉलनी परिसरात गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. ही जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत गोशाळेत पाठविली. शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रमेश लबडे अधिक तपास करीत आहेत.
--------------------
१६०० किलो गोमांस जप्त
जमजम कॉलनी परिसरात रविवारी (दि. १८) रात्री सव्वा नऊच्या सुमारास शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी रफीक खा खान (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार आहे.