"एक मराठा लाख मराठा"; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या
By शेखर पानसरे | Published: October 31, 2023 02:30 PM2023-10-31T14:30:07+5:302023-10-31T14:38:50+5:30
पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यात ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा’, आम्हाला आरक्षण नसल्याने मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये.
संगमनेर : मराठा आरक्षणासाठी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर भाऊसाहेब वाळे (वय २७, रा. झोळे, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी (दि. ३१) सकाळी ७. ३२ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली असून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यात ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा’, आम्हाला आरक्षण नसल्याने मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. ‘एक मराठा लाख, मराठा, आपला लाडका सागर मराठा’ असे त्यात लिहिले आहे.
सागर वाळे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला उपचाराकरिता घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.